मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणा-या सभेला अखेर पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान पोलिसांनी सभेसाठी १६ अटी लागू केल्या आहेत.

१ मे  महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये सभेचे आयेाजन करण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परवानगीवरून बरीच चर्चा रंगली होती. मनसेचा पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून मोठा वाद निर्माण झाला  होता. मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मे रोजीपर्यंत अल्टीमेटम दिलं आहे. त्यानंतर १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. या सगळया पार्श्वभूमीवर  त्यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही ? यावरून तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर पोलिसांनी सभेला सशर्त परवानगी दिली आहे. त्यासाठी १६ अटी शर्थी ठेवण्यात आल्या ओहत. पोलिसांकडून सभेला परवानगी मिळाल्याने मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

या आहेत अटी ….

१- सभा ४.३० ते ९.३० या दरम्यान आयोजित करण्यात यावी.
२- सभेत सहभागी होणाऱ्यांनी असभ्य वर्तन न करता स्वयंशिस्त पाळावी.
३- सभेसाठी १५ हजाराहून जास्त लोकांना निमंत्रित करू नये.
४- सभेमध्ये शस्त्र, तलवारी, स्फोटकं बाळगू नयेत.
५- वंश, जात, धर्म, भाषा, प्रदेशावरून चिथावणी देणारं वक्तव्य करू नये.
६- पोलिसांनी नेमून दिलेल्या मार्गानंच प्रवास करावा.
७- सभेदरम्यान चेंगराचेंगरी वा गोंधळासारखे प्रकार घडल्यास आयोजक जबाबदार असतील.
८ – सर्व अटींची माहिती आयोजकांनी कार्यकर्त्यांना द्यावी
९- सुव्यवस्था राखण्यासाठी मजबूत बॅरिकेट्स उभारावेत
१०- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे
११- कार्यक्रमादरम्यान अत्यावश्यक सुविधांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
१२- सभेच्या दिवसी वाहतुकीसंदर्भातील अधिसूचना सभेला येणारे वक्ते, कार्यकर्ते यांना बंधनकारक असेल
१३ – सभेसाठीच्या वस्तू, जनरेटरची व्यवस्था आधीच करावी
१४ – सभेदरम्यान अन्नदान किंवा मिठाई वाटप होणार असेल, तर त्यातून विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी
१५ – कार्यक्रमाचं ठिकाण किंवा वेळ यामध्ये कोणताही बदल करू नये
१६़- सभेसाठी आवाजाची मर्यादा ५५ डेसिबल इतकी ठेवावी लागणार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!