मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रध्दांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे व्यंगचित्र पोस्ट केलं आहे.


बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्र हळहळला. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेबांना श्रध्दांजली वाहिली. राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यातील संवाद दाखवला आहे. त्यात सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत यावेळी बाबासाहेब पुरंदरे हात जोडून उभे आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब पुरंदरेंना उद्देशून म्हणतायत, “ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस. अविश्रांत मेहनत घेतलीस, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस! ये आता जरा आराम कर ” असे व्यंगचित्रात म्हटलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *