हँडस अप !  निकाल पैसा s s !  
राज ठाकरेंचे मोदी- शहांवर फटकारे 
मुंबई (प्रतिनिधी) : पेट्रोल डिझेल वाढीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधलाय. राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून मोदी – शहांना फाटकरलय. जगात तेलाच्या किंमती खाली घसरल्या असतानाही भारतात पेट्रोल डिझेल च्या किमतीने आजपर्यंत उच्चांक गाठलाय. त्या पार्श्वभूमीवर हे व्यंगचित्र रेखाटण्यात आलंय.
काय आहे व्यंगचित्र
सर्वसामान्य माणूस गाडीत पेट्रोल भरण्यासाठी उभा आहे यावेळीच नरेंद्र मोदी हे पेट्रोल भरताना, हँडस अप !  निकाल पैसा s s !  असे म्हणताना व्यंगचित्र रेखाटलंय. तर मोदी लच्या शेजारी अमित शहा उभे आहेत. बाबांनो हेच का अच्छे दिन अशी सर्वसामान्य नागरिक प्रतिक्रिया व्यक्त करीत असल्याचे दर्शवण्यात आलंय. भाजप सरकार सर्व सामान्य नागरिकांची अप्रत्यक्षपणे लुटमार करीत
 टीका राज यांनी व्यंगचित्रातून केेलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *