औरंगाबाद : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दयावरून राज यांनी पून्हा आक्रमक भूमिका घेतली. उत्तरप्रदेशमध्ये लाऊडस्पीकर उतरले जाऊ शकतात, मग महाराष्ट्रात का नाही ? लाऊडस्पीकर उतरावेच लागतील. अन्यथा ४ तारखेनंतर आम्ही ऐकणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.
औंरंगाबाद येथील सांस्कृतीक मैदानावर राज यांची जंगी सभा झाली. भाषणाच्या सुरूवातीला राज यांनी जो इतिहास विसरतो त्याचया पायाखालचा भूगोल सरकतो असे म्हणत शिवाजी महाराजांच्या आणि एकनाथ महाराजांच्या काळातील दाखले दिले. यावेळी लाऊडस्पीकर विषयी बोलताना राज म्हणाले की, “लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. धार्मिक वळण लावू नका. राज्यातली शांतता बिघडवायची नाही. उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकर उतरवता येतात तर महाराष्ट्रातले का नाही? किती मशिदींकडे त्याची परवानगी आहे ? आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. देशातले लाऊडस्पीकर उतरलेच पाहिजेत. आम्हाला सभा घेताना सायलेन्स झोनचे कारण दिले जाते. मग त्यांना हा नियम का नाही. रस्त्यावर येऊन नमाज पढायचा अधिकार कोणी दिला ? देशातले सगळे भोंगे उतरलेच पाहिजेत. महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे, जिथे लाऊड स्पीकर लागतील तिथे दुप्पट आवाजाने हनुमानचालिसा लागलीच पाहिजे. विनंती करुन समजत नाही तर आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही असे राज म्हणाले.
राज ठाकरेंच भाषण आणि अजानचा भोंगा वाजला ….
राज् ठाकरें भोंग्यावरून आक्रमकपणे बोलत असतानाच अजान सुरू झाली,त्यावेळी राज ठाकरे थांबले त्यांनी पोलिसांनी अजान बंद करण्याची विनंती केली. आताच्या आता जाऊन तात्काळ अजान बंद करा, त्यांच्या तोंडात बोळा कोंबा त्यांना सरळ भाषेत कळत नसेल तर काय ते होऊन जाऊ द्या महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे दाखवून देऊ असा इशाराच राज यांनी दिला. संपूर्ण देशवासियांना विनंती आहे. मागचा पुढचा विचार करू नका, हे भेांगे उतरलेच पाहिजे.सर्व धार्मिक स्थळावरील लाऊडस्पीकर उतरले पाहिजे. मग मंदिरावरचेही लाऊडस्पीकर उतरले गेले पाहिजे व यांचे उतरल्यानंतर , लाऊडस्पीकर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा असे आवाहनही मनसैनिकांनी केले.
‘शरद पवार यांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे’; राज ठाकरेंचा घणाघात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे असं म्हणतं राज ठाकरेंनी पवारांवर घणाघात केला. हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा आहे पण त्याआधी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. असंही ठाकरे म्हणाले.शरद पवार नास्तिक आहे हे म्हटल्यावर त्यांना झोंबले. त्यानंतर देवाचे, पूजेचे फोटो बाहेर काढले.परंतु शरद पवारांच्या कन्येने स्वत: लोकसभेत याची कबुली दिली आहे. असंही ठाकरे म्हणाले.