मुंबई : राज्यात आगामी 15 महानगर पालिका आणि नगरपालिका तसेच नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवथीर्थ बंगल्यावर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे १४ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती दिली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा दौरा राज ठाकरे दौरा करणार आहेत अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली
मराठवाड्यात संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्र पुणे, तर, कोकणात रत्नागिरी, नागपूर, अमरावती याठिकाणी दौरा होणार आहे. सध्या 14 डिसेंबरला संभाजीनगर तर 16 डिसेंबरला राज ठाकरे पुण्यात जाणार आहेत. त्यानंतर मुंबईत नेत्यांचा मेळावा होईल या दौऱ्यावर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जातील अशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.
राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसने महाविकास आघाडी स्थापन केली त्यामुळे भाजप एकाकी पडला आहे शिवसेनेने फारकत घेतल्यानंतर भाजपला एका साथीदाराची गरज आहे त्यामुळे भाजप मनसे युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे अजूनही दोन्ही पक्षांकडून युतीवर नकार आणि होणार काहीही दर्शविलेला नाही मात्र युती बाबतचा निर्णय राज ठाकरे घेतील असे नांदगावकर यांनी स्पष्ट केलय मात्र दोन्ही पक्षातील नेत्यांकडून युतीवर कोणतेही भाष्य केले जात नसले तरी सुध्दा निवडणुकीच्या तोंडावर भाजप मनसे युतीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही