मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी चा पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा याच्या पॉर्न रॅकेट प्रकरणातील अटकेनंतर दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राज कुंद्रा वर अनेक मॉडेल ने आरोप केल्यानंतर आता आणखी एका मॉडेलने धक्कादायक खुलासा केला आहे. एका न्यूड शूटसाठी २५ हजार रुपयांची ऑफर केल्याचा खुलासा तिने केला आहे.

निकिता फ्लोरा सिंग या मॉडेलने ट्विट करून ही माहिती दिली आहे. राज कुंद्रा चा पीए उमेश कामत याने न्यूड शूटसाठी विचारल होत, त्यासाठी एका दिवसासाठी २५ हजार रुपये देण्याची ऑफर केली होती. मात्र या ऑफरला नकार दिल्याचं तिने आपल्या ट्विट मध्ये म्हटलय. राज कुद्राने पॉर्न फिल्ममधून दीड वर्षात २० कोटीची कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. राज कुंद्रा विरोधात मुंबई क्राईम ब्रँच च्या प्रॉपर्टी सेलकडे अनेक माहिती हाती लागली आहे. तसेच दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने राज कुद्राच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Likdin आणि  YouTube  वर नक्की फॉलो करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!