परळ चेंगराचेंगरी : रल्वे मंत्रयाचे चौकशीचे आदेश
मुंबई : परळ ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशीचे आदेश रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज केईएम हॉस्पिटलला भेट दिली आहे. परळ-एलफिन्स्टन ब्रीजच्या पाय-यांचं तात्काळ रुंदीकरण करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. मुंबईतल्या पादचारी पुलांच्या सुरक्षितता व क्षमतांच्या दृष्टीनं ऑडिट करण्याचेही पीयूष गोयल यांनी आदेश दिले आहेत. एलफिन्स्टन स्टेशनवर घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे मंत्र्यांचा आजचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसंच रेल्वे मंत्र्यांनी केईएम हॉस्पिटललाही भेट देऊन मृतांची विचारपूस केली आहे.

सलाम मुंबईकर : दोन तासात रक्त पुरवठा
मुंबई : परळ रेल्वे ब्रीजवरील चेंगराचेंगरीत जखमींवर केईएम रुग्णालयाला दाखल करण्यात आले. मात्र जखमींवर उपचारासाठी रक्ताची आवश्यकता निर्माण झाली होती. A पॉझिटिव्ह , A निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह आणि AB निगेटिव्ह रक्तगटातील दात्यांची गरज होती, मात्र मुंबईकरांच्या तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांतच रुग्णालयाला रक्ताचा आवश्यक तितका पुरवठा उपलब्ध झाला. त्यामुळे केईएम रुग्णालयाकडून रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्याचप्रमाणे हॉस्पिटलजवळ गर्दी न करण्याचंही आवाहन करण्यात आलं.

माजी रेल्वे मंत्रयाकडून शोक
माझ्या मुंबईत ही दुर्घटना घडल्याचं अतीव दुःख झालं आहे, असं सांगत पियुष गोयल यांनी चेंगराचेंगरीविषयी हळहळ व्यक्त केली. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही चेंगराचेंगरीच्या घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *