बाळासाहेब ठाकरेंवर लवकरच हिंदीतून चित्रपट
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर लवकरच हिंदी चित्रपट येणार आहे. बाळासाहेबांचे नातू राहुल ठाकरे हे आपल्या लाडक्या आजोबांवर चित्रपट बनवत आहेत. बाळासाहेबांचे मधले चिरंजीव जयदेव आणि त्यांच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे यांचे राहुल हे सुपुत्र आहेत.
राहुल यांनी कॅनडात फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं आहे. आमिर खानच्या पीके चित्रपटासाठी त्यांनी राजू हिरानी यांचा सहाय्यक म्हणूनही काम पाहिलं होतं. स्मिता ठाकरे यांनी ही माहिती फेसबुकवर टीझर पोस्टर रिलीज करून दिली आहे. उध्दव ठाकरे, राज ठाकरे आणि संजय राऊत हे बाळासाहेबांवर चित्रपट बनवण्याच्या शर्यतीत होते मात्र नातू राहुलने यामध्ये बाजी मारली आहे.

टीझर पोस्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *