राहूल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला
मुंबईसह राज्यभरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष.
मुंबई : अखिल भारतीय काँगेस कमिटीचे अध्यक्ष खा.राहूल गांधी यांनी आज दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताच मुंबईसह राज्यभरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे माजी खा.एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे,प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रदेश सचिव सय्यद जिशान अहमद यांच्यासह उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.