आबांच्या कन्येचा विवाह सोहळा : खा.सुप्रियाताईंनी वाटल्या अक्षता ; अजितदादा पाहुण्यांच्या स्वागताला ! 

पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता यांचा विवाह दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला प्रकृतीच्या कारणास्तव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पाहुण्यांचे प्रवेशद्वारावर स्वागत केले. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी विवाहास उपस्थित असणा-या पाहुण्यांना अक्षता वाटल्या.

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आबांची कन्या स्मिता पाटील आणि आंनद थोरात यांच्या विवाह सोहळयासाठी घरातील व्यक्ती प्रमाणे अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सकाळपासूनच उपस्थित होते. त्यांनी विवाहासाठी येणा-या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत केले तर त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे अक्षताचे ताट हाती घेवून उपस्थित पाहुण्यांना अक्षता वाटल्या खा.सुप्रियाताई यांनी आ.सुमन पाटील यांची भेट घेतली असता ताईंना बघून सुमन पाटील यांना अक्षरशः गहिवरून आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पायाच्या दुखण्याने त्रस्त असल्याने त्यांना डॉक्टरांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिल्याने ते या विवाहला उपस्थित राहू शकले नाहीत.

या विवाह सोहळ्यास अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट,आ. सुनील तटकरे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, विश्वजीत कदम,प्रफुल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण,मंत्री राम शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. निलम गोऱ्हे, साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांसह राजकीय क्षेत्रातीलअनेक नेते मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *