गिरीश बापटांच्या कार्यालयाबाहेर महिलांनी चुली पेटवल्या

पुणे : वाढत्या महागाईच्या विरोधात पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठ येथील कार्यालयाबाहेर चुली पेटवून भाकरी थापत आंदोलन केले. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले जात असून, गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीमुळे सर्व सामान्यांमध्ये रोष वाढत आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे महाग झाले आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या कारभारावर चव्हाण यांनी टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!