कल्याण:- कल्याण वाहतूक विभागाच्या वतीने रस्ते सुरक्षेबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी यमराजाची वेशभूषा धारण करून वाहनचालकांना वाहतूकीच्या नियमांबाबत माहिती देण्यात आली.

रस्ते अपघातांची वाढती संख्या विचारात घेता रस्त्यावरून गाडी चालवताना नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. यासंदर्भात बॅनर, पोस्टर्स आणि पथनाट्याच्या माध्यमातून संदेश देण्यात आला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून हेल्मेट वापरा, नेहमी सीटबेल्ट लावा, गाडी चालवताना रस्त्यावर लक्ष ठेवा, वेगमर्यादा पाळा, ट्रॅफिक सिग्नलचे पालन करा, मदयपान करून गाडी चालवू नये, लेनमध्येच गाडी चालवा, वाहन चालवताना सुरक्षित अंतर पाळा अशाप्रकारच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांनी दिली. या जनजागृती मोहिमेत वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक गिरीश बने, पोलिस उप निरीक्षक सुधाकर बडगुजर यांच्यासह वाहतूक पोलिस अमलदार आणि ट्राफिक वार्डन सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!