डोंबिवली, २३ फेब्रुवारी : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (ई) प्रभाग अंतर्गतअसणाऱ्या शंकेश्वर देसलेपाड्यात मे. महावीर विकासकाचे बांधकाम सुरू आहे. वेळोवेळी बांधकाम दरम्यान विकासक रस्त्यावर सांड पाणी सोडत असतो. परिणामी त्या रस्त्यावरील सांडपाण्यामुळे रस्ते खराब होऊन चिखल होत आहे. याबाबतीत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही कारवाई होत नाही. समस्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने गुरुवारी कै. मनोज दिसले प्रतिष्ठान माध्यमातून अध्यक्ष संजय दिसले यांनी लक्षणिक उपोषण केले. या उपोषणात विभागातील प्रतिष्ठीत नागरिकांनी सहभाग घेतला.
याबाबत संजय दिसले म्हणाले, तक्रार, पत्रव्यवहार करूनही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. आम्ही महावीर बिल्डर आणि पालिका अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली तेव्हाही ही समस्या सोडविण्यात येईल असे सांगितले पण पुन्हा काही नाही. मग आम्ही उपोषणाचा इशारा दिला तरीही काहीच फरक पडला नाही. पावसाळ्यात महिला अक्षरशः साड्या वर करून पाण्यातून वाट काढीत होत्या. आताही महापालिकेने रस्ते केले तेही खराब होत आहेत. असं होतं असूनही पालिका काहीही कारवाई करीत नाही त्यामुळे उपोषण सुरू केले. पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई म्हणुन त्या विकासकावर नोटीस बजावली. परंतु त्याचा बांधकाम परवाना तात्तपुरता निलंबन करण्याची कोणताही पाठपुरावा केला नाही.
तर याविषयी पालिकेचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन घेतला नाही.