Prisoners aged 50 years and above are allowed to use beds at their own expense

कारागृहे सुधारगृहे होण्याच्या दृष्टिने अमिताभ गुप्ता यांचे एक पाऊल

मुंबई , प्रतिनिधी दि.२२ : राज्यातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

याचाच एक भाग म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये ५० वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बंद्यांना स्वखर्चाने जाड बेडिंग (अंथरुण) व उशी आणण्याची परवानी देण्यात आली आहे.

कारागृह विभागातील अडी-अडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

त्यामध्ये या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात परवानगीबाबतचे परिपत्रक सर्व प्रादेशिक विभाग प्रमुख व सर्व कारागृह अधीक्षक यांना परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या बैठकीस कारागृह विभागाचे सर्व कारागृह उपमहानिरीक्षक व सर्व कारागृहांचे अधीक्षक उपस्थित होते.

राज्यातील कारागृहांमध्ये ५० वर्षे व त्यावरील वयाचे बंदी असून त्यात काही वयोवृद्ध बंदी आजारी असतात. अशा बाबींचा सारासार विचार करून वय ५० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन बंद्यांना साधारणतः जाड बेडिंग (अंथरून) तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाली व त्याच्या प्रारूपास मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *