दिल्ली : आजपासून राज्यात गणेशोत्सव सुरू झाला आहे. आज राज्यासह देशाच्या विविध भागात गणरायाचं भक्तीभावानं आगमन झालं आहे महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे जगात आकर्षण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खास मराठीतून ट्वीट करत राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिला आहेत काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनीही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!’, असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण देशवासियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा, असं अमित शहांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी श्री गणेश चुतर्थीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या देशाच्या प्रगतीतील सर्व विघ्न दूर होऊ दे, असं साकडं राहुल गांधींनी ट्वीट करत गणपती बाप्पाला घातलं आहे.