मुख्यमंत्री आणि पालकमंत्रयांच्या जीवाला धोका, पण पोलिसांची बघ्याची भूमिका : प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट
संभाजी भिडे यांच्या समर्थकाची फेसबूकवर पोस्ट
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या जीवाला धोका असून, याची माहिती पोलिसांना असतानाही ती लपवून ठेवली जात आहे असा गौप्यस्फोट भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. संभाजी भिडे गुरूजी यांचे हस्तक रावसाहेब दानवे नावाच्या व्यक्तीनेच ही पोस्ट सोशल मिडीयावर टाकली असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केलाय.
भीमा कोरेगावसाठी आकडा कमी पडत असेल तर गिरीष बापट आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही बिनधास्त कापू शकता, असं फेसबूकवर पोस्ट करण्यात आलय. ही पोस्ट 1 जानेवारीला टाकण्यात आलीय अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. मात्र ही माहिती मुख्यमंत्रयापासून लपवून ठेवणारे पुणे शहर पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त , पुणे ग्रामीणचे अधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक आणि गुप्तवार्ता विभाग प्रमुखांना पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी आंबेडकर यांनी केलीय.रावसाहेब पाटील या तरूणाच्या फेसबुक पोस्टचे फोटोही प्रकाश आंबडेकर यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या हिंदू संघटनांवर समाजाचे नियंत्रण आहे. मात्र, मिलिंद एकबोटे, भिडे गुरुजींच्या संघटनांवर कोणाचे बंधन नाही. आपला हेतू साध्य झाला नाही तर या संघटनांचे कार्यकते थेट हत्येची भाषा करतात. त्यामुळे अशा संघटना प्रोत्साहन न देता वेळीच त्यांना आवरण घालण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले. कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं आहे. मुंबईत 16 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून पोलिसांनी ही अटक केलीय. त्यामुळे ही सगळी कारवाई चुकीच्या पध्दतीने सुरू असल्याचं आंबेडकर म्हणाले. योगेश प्रल्हाद नावाचं कंधारचा विद्यार्थी या हिंसाचाराचा बळी ठरला, ज्याला पोलिसांच्या लाठीमारामध्ये मृत्यू आला. शाळेत गणिताचा पेपर देऊन तो बाहेर पडला. शाळेच्या आवारात जाऊन लाठी हल्ला करण्यात आला होता. पोलिसाची लाठी योगेशच्या डोक्याला काठी लागल्याने त्याचा मृत्यु झाला. त्याबाबत अजून एफआयआर दाखल केला जात नाही. ज्या पोलिसाची लाठी योगेशला लागली त्याची ती काठीही जप्त केली जात नाही. पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी हे कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.