भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक : सर्वांनी संयम राखण्याचे अॅड प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
मुंबई : भीमा कोरेगाव येथील सणसवाडीत झालेल्या हिंसक घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवार 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. मात्र बंदच्या काळात सर्वसामान्यांना त्रास होईल असे काही करु नका. सर्वांनी संयम बाळगून शांतता राखावी असे आवाहन आंबेडकर यांनी केलय.
महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषदेसाठीच्या अडीचशे संघटनांचे फ्रंट, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी बंदचे आवाहन केलय. कोरेगाव ते शिरुरपर्यंतच्या इमारतींवर दगड ठेवण्यात आले होते. या इमारतींवरुन दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शिरुर-कोरेगाव-चाकणपर्यंतच्या गावांचं दोन वर्षांसाठी शासकीय अनुदान बंद करावं,” अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली. मनोहर उर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि घुगे हेच या घटनेमागचे सूत्रधार असून, त्यांच्याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.