नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीतल्या महत्त्वांच्या नावांपैकी एक नाव म्हणजे अरुण गोविल यांचं. रामायण या रामानंद सागर दिग्दर्शित मालिकेत रामाची भूमिका केल्याने घराघरांत पोहचलेले अरुण गोविल यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. मेरठ लोकसभा मतदारसंघातून अरुण गोविल निवडणूक लढवणार आहेत.
काही वेळापूर्वीच भाजपाची पाचवी यादी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीर केली. या यादीत महत्त्वाची नावं आहेत. कंगना रणौतचंही नाव याच यादीत आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातल्या मंडी या ठिकाणाहून लोकसभेचं तिकिट भाजपाने दिलं आहे. रामायण मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात प्रभू रामाचं स्थान निर्माण करणाऱ्या अरुण गोविल यांना तिकिट देण्यात आलं आहे. मेरठमधून ते लोकसभा निवडणूक लढवतील.
