खड्डयांवरून शिवसेना खासदार आणि मनसे आमदारांमध्ये जुंपली !

डोंबिवली/ प्रतिनिधी : नेमिची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे पावसाळा आणि शहरातील रस्त्यावरील खड्डे नेहमीचेच समीकरण बनले आहे. डोंबिवली आणि कल्याण शहरातील रस्त्यावरील खड्डयांची समस्या दरवर्षीप्रमाणे यंदा चांगलीच चव्हाटयावर आली आहे. आता खड्डयांवरून शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्यात चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे.
https

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याप्रमाणेच डोंबिवलीतही सहज फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याण-शीळ मार्गावरचे खड्डे भरले जातील, असं उपरोधिक आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं होतं, यावरून शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी “आमदारांनी ट्विटरच्या बाहेर पडून सहज मतदारसंघात फेरफटका मारावा, खड्डेभरणीची कामं कुठे सुरू आहेत ते समजेल” असा टोला लगावला आहे. मात्र या टोल्यानंतर आमदार पाटील यांनी चक्क खासदार शिंदे यांच्या डोंबिवलीतील बंगल्यासमोरील रस्त्यांची र्दुदशा आणि खड्डयांचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे खड्डयावरून शिंदे विरूध्द पाटील यांच्यात सामना रंगल्याचे दिसून येत आहे. खड्डे आता जीवघेणे ठरत असल्याने नको हा पावसाळा आणि नको हा प्रवास अशी उद्विग्न प्रतिक्रिया शहरवासीय व्यक्त करताना दिसत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होण्याचा धोका असल्याने वाहनचालक जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहेत. यातून कल्याण डोंबिवलीकरांची कधी सुटका होणार हाच खरा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!