डोंबिवलीच्या पूर्वा व आशुतोष वर महाराष्ट्र- ब संघाची जबाबदारी
डोंबिवली : पंजाब येथे राष्ट्रीय कॅडेट व ज्युनियर गटाच्या ज्युदोच्या स्पर्धा सुरू आहेत. ज्युदो फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित या अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र- ब संघ (मुंबई सोडून)सहभागी झालाय  या संघाच्या व्यवस्थापकपदी पूर्वा मॅथ्यू व  संघ मार्गदर्शकपदी आशुतोष लोकरे यांची नियुक्ती करण्यात आलीय. महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनने ही नियुक्ती केलीय. २८ मार्च ते ३१ मार्च २०१८ दरम्यान पीएपी कॅंपस, जालंधर कॅंटोन्मेंट, पंजाब येथे या स्पर्धा सुरू आहेत. या संघात १६ मुली व १६ मुलांचा समावेश आहे.   पूर्वा मॅथ्यू आणि आशुतोष लोकरे डोंबिवलीच्या व्हिक्टरी ज्युदो क्लबचे ज्युदो कोच म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *