मुंबई : एकिकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात आजी- माजी आणि भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर राजकीय तर्क वितर्कांना लढवले जाऊ लागले आहेत, मुख्यमंत्रयाच्या या गुगलीने सर्वचजण अवाक झाले आहेत तर दुसरीकडे जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याने राजकीय घडामेाडींना चांगलीच फोडणी मिळाली आहे. मात्र मुख्यमंत्रयाच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी येत्या काही दिवसात भाजपचे आमदार सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे हे वक्तव्य केल्याचे म्हटलयं, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल वक्तव्य केलयं. त्यामुळे महाविकास आघाडी भाजपला धक्का देणार कि भाजप आघाडी सरकार गुंडाळण्यात यशस्वी होणार ? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित हेात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचे संकेत मिळाल्याची चर्चाही रंगली. मात्र संजय राऊत यांनी मुख्यमंत्रयाची भेट घेतल्यांनतर सुचक विधान केलय. ज्यांना भावी सहकारी व्हायचं आहे त्यांना आमच्याकडं यायचं आहे त्यांच्यासाठी हे वक्तव्य असल्याची सारवासारव राऊत यांनी केलीय. त्यामुळे राऊत याच्या म्हणण्यानुसार भाजपचे कुठले आमदार शिवसेनेच्या वाटेवर आहेत हेच पाहावे लागणार आहे. तर दोन दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणून नका दोन दिवसात कळेल असे वक्तव्य केलं होतं. त्यातच आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच गाडीने प्रवास केल्याने राजकारणात पडद्याआड काही तरी घडामोडी घडत आहेत का ? असाच प्रश्न उपस्थित हेात आहे.

हा विनोदाचा भाग : विश्वजीत कदम
काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून भाजपला टोला लगावला आहे. ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरळ व्यक्तिमत्त्व आहे. ते अनेकदा विनोद करत असतात. त्यामुळे भाजपबाबत त्यांनी केलेलं वक्तव्य हा विनोदाचा भाग असावा. त्याला फार काही गांभीर्याने घेण्याची गरज नाही,’ अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली आहे.

ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल.. नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी २५ वर्षे सत्तेत राहू असा दावा केला हेाता ते काय घेऊन बोलतात माहिती नाही पाणी पितात कि अजून काही..ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल असं वक्तव्य राणे यांनी केलय.

राजकारणात चमत्कार होऊ शकतो : विखे पाटील
भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटी यांनीही मुख्यमंत्रयाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. राजकारणात काहीही होऊ शकते. सध्या राज्यात महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे ही सत्तेसाठी आहे. त्यात वैचारिक भूमिका सध्या नाही. सत्ता असो किंवा नसो पारंपरिक युती शिवसेना आणि भाजपात आहे. ते एकत्र येत असतील तर आपण त्याचे स्वागत केले पाहिजे. मुख्यमंत्री यांनी जे विधान केले आहे ते त्यांचे व्यक्तीगत आहे. मात्र, राजकारणात कायमस्वरूपी कोणी मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. त्यामुळे चमत्कार होऊ शकतो.

माजी मंत्री म्हणू नका – चंद्रकांत पाटील
दोन दिवसांपूर्वीच देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं सूचक विधान केलं. या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!