२ आँक्टोबर २०२१ या दिवशी समतोल टिमला कल्याण रेल्वे स्टेशन प्लेटफाँम क्रमांक ६ वर एकटाच बसलेला १३ वर्षे वयाचा आग्रा वरून आलेला मुलगा भेटला. रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी नेला असता बाल कल्याण पोलीस अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे वरीष्ठ पोलीस निरिक्षक यांनी मुलगा नोंद करायला आणला म्हणून संस्थेची चौकशी करावी लागेल असे सांगितले. कारण आम्ही समतोलला ओळखत नाही.


चाईल्ड लाईन असताना तुम्ही किंवा इतर कोणतीही संस्था काम करू शकत नाही अशी धमकीही दिली. सामान्य नागरिक मुलाला मदत करू शकत नाही का ?नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था मुलासाठी पोलीसाची मदत घेऊ शकत नाही का ? आजही लाखो मुले घरापासून दूर वेगवेगळ्या कारणाने दुर होतात किंवा आणली जातात, यासाठी एक संस्था म्हणजे चाईल्ड लाईन पुरेशी आहे असे पोलिस यंत्रणेला वाटते का? म्हणजे हे त्यांचे अज्ञान आहे असे मला वाटते. म्हणजे पोलीस असताना समाजात चोरी कशी होते असा प्रश्न उपस्थित केला तर पोलीस काय उत्तर देतील?


मुलाला मदत करण्या ऐवजी जर भितीदायक वातावरण पोलीस ठाण्यात असेल तर ते सरंक्षण करणार की मारणार अशी चिंता कार्यकर्ते यांना साहजिकच वाटली असावी मग बालप्रेमी पोलीस स्टेशन ही संकल्पना फक्त पेपरवरच असावी वाटते. मुलाला मदत होणे अपेक्षित आहे हे समतोल च्या कार्यकर्ते यांना वाटतेच त्यामुळे आम्ही चाईल्ड लाईन कडे मुल सोपवले, परंतु समतोलच्या पेपर वर सही चाईल्ड लाईनने दिली नाही. कदाचित त्यांना आपली केस म्हणून दाखवायची असावी हरकत नाही खरी सेवा करताना स्पर्धा कशासाठी ?

पण आता बालगृहात मुल जाईल तेव्हा त्याला वाटेल मी असा कोणता गुन्हा केला की इथे आलोय, कारण बालगृहात मुलांना अपेक्षित असे वातावरणात नसते अशी मुलेच सांगतात शिवाय मला मदत करताना किती गडबड आहे मला पोलीस अंकल मदत करतील असे वाटले होते पण…।
परंतु अशीच परिस्थिती नेहमीच राहिली तर मुलांच्या समस्या ही कमी होणार नाही तर वाढतच जाईल. आम्हाला व आपल्याला या बालकांसाठी काम करायचेच आहे सध्या पोलीस यंत्रणेबाबतीत समाजात कोणत्या प्रकारची ओळख झाली आहे हे मी न सांगितलेले बरे कोण कुठे पळाले आहे कोण सापडतच नाही वगैरे वगैरे आपला प्रश्न मुलांचा आहे लवकरच आम्ही आमच्या कामातुनच त्यांना आमची ओळख करून देऊ अशी बालभीतीदायक अधिकारी असतील तर कोण कोणाचे सरंक्षण करणारे आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होतील

अशा अनेक प्रकारच्या अडचणीत समतोल गेली १७ वर्षे सातत्याने काम करीत आहे फक्त बालप्रेमी समाज आणि बालप्रेमी वातावरण निर्माण होण्यासाठी च…….
विजय जाधव
समतोल फांऊडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *