मुंबई : लालबागच्या राज्याच्या दरबारात आज पोलिस निरीक्षक संजय निकम यांनी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर हात काय पाय पण लावेन अशी अरेरावीची भाषा वापरली. मात्र हा सगळा प्रकार कॅमे-यात कैद झाला असून सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे त्यामुळे अरेरावीची भाषा वापरणा-या अधिका-यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे
कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता भाविकांना राजाचे दर्शन घेण्याची परवानगी नाही त्यासाठी पोलिसांनी बॅरीगेटस लावले होते दरम्यान लालबाग गणेश मंडळातील लोकांना आणि पत्रकारांना पास देण्यात आले आहेत पत्रकारांनी पास दाखवूनही पोलिसांनी त्यांना अटकाव करीत धक्काबुक्की केली पोलीस निरीक्षक संजय निकम यांचा धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिसांच्या या भूमिकेविषयी पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दंडुकेशाही योग्य नाही : देवेंद्र फडणवीस
मुंबई : लालबागचा राजा’च्या परिसरात पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. इतकी दंडुकेशाही योग्य नाही. ह्या दंडुकेशाहीच्या जोरावर कुणी कायदा-सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असेल तर बरं नाही,’ असं फडणवीस म्हणाले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे, पण त्या आधी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.
फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला. ‘गेल्या दोन वर्षांमध्ये माध्यमांवर दबाव तयार करण्याचा प्रयत्न होतोय. कधी गुन्हे दाखल करायचे, कधी अटक करायची तर कधी आणखी काही कारवाई करायची. एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय,’ असं फडणवीस म्हणाले.