डोंबिवली, दि. 9 (प्रतिनिधी):
डोंबिवली येथील महामार्ग पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रात रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी पोलिसांनी एक अनोखी संकल्पना साकारली आहे. “जीवन अनमोल है भय्या” हे गीत, जे पोलीस हवालदार संजय घुडे यांनी आपल्या स्वरांनी सादर केले आहे व महेशकुमार धानके यांनी लिहिले आहे, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती निर्माण करत आहे.
या गाण्याच्या माध्यमातून “जीवन अनमोल आहे” हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत या गीताचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर सुरक्षिततेचे महत्व पटवून देण्यासाठी होत आहे.
वाहतूक नियमांचे पालन आणि अपघात रोखण्यासाठी हे गाणे शाळा, महाविद्यालये, तसेच विविध कार्यक्रमांमध्ये सादर केले जात आहे. या उपक्रमामुळे रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक जनजागृती होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
—–