मुंबई : मुंबईतील स्टार्टअप कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिक देशात आपली पहिली कार लाँच करणार आहे. तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला ही मायक्रो इलेक्ट्रिक कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फक्त दोन हजार रुपयांमध्ये बुक करता येणार आहे.
इलेक्ट्रिक कारचे नाव ‘ईएएस – ई’ असे असून ही कार १६ नोव्हेंबरला देशात सादर होणार आहे. या कारचे कंपनीने प्री-बुकिंग अधिकृतपणे सुरू केले आहे. ही मायक्रो इलेक्ट्रिक कार असेल जी मारुती अल्टोपेक्षा आकाराने लहान असेल. या कारमध्ये चार लोकांची आसनक्षमता असेल. या कारची टॉप स्पीड ७० किमी प्रतितास असेल.ही अतिशय हलकी इलेक्ट्रिक कार असणार आहे. ज्याचे वजन सुमारे ५५० किलो असेल. या इलेक्ट्रिक कारची किंमत ४-५ लाख रुपये (एक्स शोरूम) असेल. अशी कंपनीनं माहिती दिली आहे.