मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुन विरोधकांचे टिकास्त्र

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. मुंबई सोलापूर आणि मुंबई साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेसना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. “वंदे भारत ट्रेनमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रेला फायदा होणार आहे. तसेच नवीन उद्योगांना चालना मिळणार असून, रोजगार निर्मिती होणार असल्याचे  मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. २२ दिवसात मोदींचा हा दुसरा मुंबई दौरा असल्याने या दोन्ही दौरे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीशी जोडले जात आहे. मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुन विरोधकांनी टिकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधानांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला नववी आणि दहावी वंदे भारत एक्सप्रेस समर्पित करताना मला आनंद होत आहे. दोन्ही वंदे भारत ट्रेन मुंबई आणि पुणे या शहरांना जोडणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल. देशातील १७ राज्यांतील १०८ जिल्हे वंदे भारत एक्सप्रेसला जोडले जाणार आहेत. पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात १० लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे पायाभूत सुविधांमुळे मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. नवीन उद्योगांना चालना मिळणार आहे मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

वंदे भारत ट्रेनमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रेला फायदा होणार आहे. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घ्यायचं असेल, नाशिक येथील रामकुंडाला जायचं असेल, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी क्षेत्राचं दर्शन करायचं असेल तर वंदे भारत ट्रेनमुळे हे सगळं खूप सोपं होणार आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले. अशाचप्रकारे मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई, सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आणि आई तुळजाभवनीचं दर्शनासाठी सगळं सोपं होणार आहे, असा दावा मोदी यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. त्यांच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची भर टाकेल असे आश्वासन दिले. महाराष्ट्रात रेल्वेसाठी १३ हजार ५०० कोटी रूपये कधीही मिळाले नव्हते असे मुख्यमंत्री म्हणाले.

बोहरा समाजाकडून मला प्रेम मिळालं

 मुंबईत वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोदींनी मुंबईतील मरोळमधील दाऊदी बोहरा समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी अल जामिया तूस सैफियाह सैफ अकादमीच्या एका कॅम्पसचे उद्घाटन केले. योवळी बोलताना मोदी म्हणाले की, बोहरा समाजाकडून मला प्रेम मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. परदेशात गेलो तरी बोहरा बांधव भेटतात. बोहरा समाजामुळे गांधीजींचं स्मारक झाल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले.  

बोहरा समुदायाशी माझं खूप जुनं नातं आहे. माझ्यासाठी हे कुटुंबात आल्यासारखं आहे. मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. मी चार पिढ्यांपासून या बोहरा समुदयाशी जोडलेलो आहेत. असं सौभाग्य खूप कमी लोकांना मिळतं. जेव्हा इथे येण्याची संधी मिळते तेव्हा माझा आनंद अनेक पटींनी वाढला आहे. बोहरा समाजाने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलंय अशा शब्दात मोदींनी त्यांचं कौतुक केलं.

२२ दिवसात मोदींचा दुसरा मुंबई दौरा :  बीएमसी निवडणुकीची तयारी सुरू

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा हा बीएमसी निवडणुकीशी जोडला जात आहे. २२ दिवसात मोदींचा हा दुस-यांदा मुंबई दौरा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याची राजकीय चर्चा  चांगलीच रंगली आहे. १९ जानेवारीला मोदींनी मुंबई दैारा केला होता. यावेळी मोदींनी मुंबई मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला मुंबई महापालिकेच्या अनेक विकास कामांचं भूमिपूजन केले होते. मुंबईकरांचा विकास साधायचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा सत्ता द्या असे आवाहन मुंबईकरांना मोदींनी भाषणातून केलं होतं. तसेच २५ वषे सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीका केली हेाती. आज मोदींच्या मुंबई दौ-यात   वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून मुंबईतील काही विकास कामांचंही उद्धाटन केले. तसेच बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौ-याची चर्चा रंगली आहे.

मोदींच्या मुंबई दौ-यावरून विरोधकांचे टीकास्त्र

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा मुंबई दौरा होता. मोदींच्या मुंबई दौऱ्यावरुन विरोधकांनी टिका केली आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत यावं लागतंय म्हणजे भाजपचं राज्याचं नेतृत्व कमकुवत आहे, असा याचा अर्थ होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींचा दौरा म्हणजे याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत अशी खोचक टीका केली आहे.

खासदार राऊत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक त्यांच्या पक्षाने फार गांभीर्याने घेतल्या आहेत. पण देशासमोर वेगळे प्रश्न आहेत. संसदेत विरोधकांनी अदानीच्या खिशात एवढा पैसे कुठून आला याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याचे उत्तर मोदी द्यायला तयार नाहीत पण ते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. सरकार डबल इंजिनचं असो ट्रिपल किंवा चार इंजिनचं असो. अथवा हवेत उडणारा असो. पण, मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकणार असणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.

पटोले म्हणाले की, निवडणुकीशिवाय मोदींना मुंबई, महाराष्ट्राची आठवण होत नाही. जानेवारीत मेट्रोचे उद्घाटन व आता वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ निमित्त आहे. मोदींच्या दौऱ्याने कसलाही फरक पडत नाही मात्र मुंबईच्या दुसऱ्या दौऱ्यात तरी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर बोलणे अपेक्षित होते परंतु त्यांनी पुन्हा मुंबई व महाराष्ट्राची घोर निराशच केली, असा घणाघाती हल्ला पटोले यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!