श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही जवानांसोबत नौशेरा येथे दिवाळी साजरी केली. जवांनाशी हस्तांदोलन करत स्वत:च्या हाताने त्यांना मिठाई भरवली. यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला. लष्करातील जवान म्हणजे माझं कुटुंब आहे. या कुटुंबासोबतच मी प्रत्येक दिवाळी साजरी केली आहे. आधी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मी जवानांसोबत दिवाळी साजरी करायचो. आता देशाचा पंतप्रधान म्हणून दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी करतो, असं मोदींनी सांगितलं.
मोदी म्हणाले की, मी प्रत्येक दिवाळी आपल्या जवानांसोबत साजरी करणार आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिक या दिवाळीच्या निमित्ताने एक दिवा पराक्रम, शौर्य, त्याग आणि तपस्या या नावाने लावून प्रकाशमय करेल” तुम्ही देशाच्या सुरक्षेचे कवच आहात. तुमच्यामुळे संपुर्ण देश शांतेतत राहु शकतो. तुम्ही पार पडत असलेल्या कर्तव्यामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित आहेत. त्यासाठी तुमचे खूप-खूप आभार असेही मोदी म्हणाले.