डोंबिवली : इनरव्हिल क्लब आँफ डोंबिवली ईस्ट या संस्थेतर्फे शनिवारी वृक्षारोपणाचा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एमआयडीसी मधील गँलेरिया ते आर.आर.हाँस्पिटल या मार्गावर तब्बल तेराशे (१३००) शोभिवंत झाडे लावण्यात आली. डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांनी वृक्षारोपण करुन या प्रकल्पाचे उदघाटन केले. पर्यावरण दक्षता मंच व एन.एस.एस.या उभय संस्थेचे कार्यकर्ते व इनरव्हिलच्या सभासद यांनी उत्साहाने वृक्षारोपण करत झाडे लावा.झाडे जगवा. पर्यावरणाचा समतोल राखा..वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे असा मंत्रजागर केला
त्यानंतर झालेल्या नेटक्या कार्यक्रमात व्यासपीठावर डॉ. खासदार श्रीकांत शिंदे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे. सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याणचे उप.अभियंता पराळे.डोंबिवली शहर शिवसेना प्रमुख राजेश मोरे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम. माजी स्थायी समिती सभापती रमेश सुक-या म्हात्रे आणि इनरव्हिलच्या अध्यक्षा व उप.अभियंता रोहिणी लोकरे उपस्थित होते. यानंतर क्लबच्या विजया नांद्रे यांनी झाडांचा आर्थिक खर्च दिल्याबदल..शिल्पा नातू यांनी प्लबिंग व पाणी व्यवस्था करण्यासाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल. शीतल दुसाने व भारती पालकर यांनी झाडांना नियमित पाणी देण्याचे ठरवल्याबदल. तसेच पर्यावरण दक्षता मंचाच्या रुपाली शाईवाले. व एन.एस.एस.चे प्रोग्रॅम आँफिसर पुष्कर दामले यांचा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..तसेच प्रतिभा बिस्वास, अंजली खिस्ती, मीना गोडखिंडी, उमा आवटेपुजारी यांचा साहित्यिक योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, इनरव्हिलचे सेवाभावी काम इतरांनी अनुकरण करण्यासारखेच आहे. आज क्लबने सामाजिक बांधिलकी समजून समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे. क्लबच्या गंगाजळीतून व सभासदांच्या आर्थिक सहकार्यातून एका चांगल्या कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. त्याबद्दल क्लबचे अभिनंदन केले तसेच क्लबला विविध सेवाभावी उपक्रम करण्यासाठी पाच लाख (५ लाख)रूपये देणगी जाहिर केली. तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेतर्फे सुरु असलेल्या विकासकामाची माहिती दिली. विशेष करून सुंदर टिकावू रस्ते शिवसेनेतर्फे तयार होत आहेत असे नमूद केले तसेच क्लबच्या सेवाकार्याने प्रभावित होवून डोंबिवली शहर शिवसेना प्रमुख राजेश मोरे यांनी एक लाख रुपये तर माजी स्थायी समिती सभापती रमेश सुक-या म्हात्रे यांनी ५१ हजार रूपयांची देणगी जाहीर केली..