मध्यरात्रीपासून पेट्रोल २ रूपये तर डिझेल १ रूपयाने स्वस्त
मुंबई : केंद्रसरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रेाल आणि डिझेलच्या दरात कपातीचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच पेट्रेल २ रूपये आणि डिझेल १ रूपयाने स्वस्त होणार आहे अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली. दिवाळीच्या तोंडावर सरकारने वाहनचालकांना दिलासा दिला आहे. पेट्रोलचे दर कमी केल्याने 940 कोटी, तर डिझेलचे दर कमी केल्याने 1 हजार 75 कोटींचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. जवळपास 3 हजार 67 कोटींची घट अपेक्षित आहे. मात्र राज्य सरकार काटकसरीतून घट भरुन काढणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!