मुंबई : सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर मुंबई महापालिकेद्वारे कडक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या सुमारे ९ महिन्यांमध्ये १९ हजारांपेक्षा अधिक व्यक्तिंकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल रुपये ३९ लाख १३ हजार १०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती उप आयुक्त (डॉ.) संगीता हसनाळे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मुखपट्टी (मास्क) वापरावी, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांकडून पालिकेकडून रुपये २००/- एवढा दंड आकारला जात आहे. एका जनहित याचिकेच्या प्रकरणी मा. उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
या अंतर्गत सर्वाधिक दंड वसुली ही प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘ए’ विभागातून करण्यात आली असून, ती रुपये ०६ लाख १५ हजार ८०० इतकी आहे. या खालोखाल ‘एल’ विभागातून रुपये ०६ लाख १२ हजार २००, तर ‘सी’ विभागातून रुपये ०४ लाख ५२ हजार २०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.

विभागनिहाय दंड वसुली

ए विभाग – रुपये ६,१५,८००/-
बी विभाग – रुपये ३,२२,२००/-
सी विभाग – रुपये ४,५२,२००/-
डी विभाग – रुपये २,५७,२००/-
ई विभाग – रुपये २०,०००/-
एफ दक्षिण विभाग – रुपये २,१७,४००/-
एफ उत्तर विभाग – रुपये ५०,६००/-
जी दक्षिण विभाग – रुपये २६,०००/-
जी उत्तर विभाग – रुपये २५,९००/-
एच पूर्व विभाग – रुपये १,७१,४००/-
एच पश्चिम विभाग – रुपये २५,८००/-
के पूर्व विभाग – रुपये २७,०००/-
के पश्चिम विभाग – रुपये ९५,६००/-
पी दक्षिण विभाग – रुपये १,०५,८००/-
पी उत्तर विभाग – रुपये ३,७९,६००/-
आर दक्षिण विभाग – रुपये ३४,३००/-
आर मध्य विभाग – रुपये ४३,८००/-
आर उत्तर विभाग – रुपये १,१९,८००/-
एल विभाग – रुपये ६,१२,२००/-
एम पूर्व विभाग – रुपये २०,४००/-
एम पश्चिम विभाग – रुपये १,१६,८००/-
एन विभाग – रुपये ७१,३००/-
एस विभाग – रुपये ९०,४००/-
टी विभाग – रुपये ११,६००/-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!