ठाणे / प्रतिनिधी : ठाण्यात कोरोनाचा विळखा पडल्याने रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिकेने काही हॉटेल्स आणि रुग्णालये कोव्हीड-19 म्हणून घोषित केले. मात्र याच हॉटेलमध्ये 10 ते 15 जणांचा पार्टीचा झिंगाट सुरू असल्याचे समोर आले आहे. याबाबत ट्विट करताच ठाणे पोलिसांनी छापेमारी केली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासावे अशी मागणी पर्दाफाश करणाऱ्या समाजसेवक डॉ.बिनू वर्गीज यांनी केली आहे.
माजीवडा नाक्यावरील हॉटेल कॅपिटल हे तत्कालीन पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या क्वारंटाईन कोव्हीड-19 म्हणून याची घोषणा केली. मात्र पाच दिवस एकाच माणसाच्या नावाने हॉटेल कपिटलमध्ये रूम बुक झाला कसा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हॉटेल कॅपिटलचा रूम हा विनायक गावंड यांच्या नावे बुक होता. याच हॉटेलमध्ये पार्टीचा झिंगाट सुरू होता आणि 10 ते 15 जण मास्क न लाावता सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवीत असल्याचे समोर आले आहे. समाजसेवक डॉ वर्गीज यांनी याबाबत केलेल्या हालचाली आणि ट्विट नंतर रात्री 3-30 वाजत ठाणे पोलीस सरसावले मात्र कॅपिटल हॉटेल पुन्हा जैसे थे झाले. रूम मध्ये सुरू असलेल्या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि कोविड-19 घोषित हॉटेल कॅपिटल मधला झिंगाट चव्हाट्यावर आला. —