मुंबई : प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतला घोटाळा अर्थात PAP घोटाळ्यात किरीट सोमय्यांनी आज थेट शरद पवार आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. २० हजार कोटींचा घोटाळा आहे. शाहीद बलवा आणि पवारांचे निकटवर्ती चोरडिया यांना लाभ मिळाला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. १हजार ९०३ सदनिका बांधल्या जात आहेत. त्यासाठी वेगवेगळी आरक्षणं हटवली जात आहेत असा आरोप त्यांनी केला. या PAP घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

सोमय्या म्हणाले, PAP घोटाळ्याचा प्रसाद शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील भेटला आहे. PAP घोटाळ्यात पवार परिवार सामील आहे. मुंबई महापालिका ठाकरे सरकारच्या 2000 कोटींच्या PAP घोटाळ्यात आता शरद पवार आणि पवार परिवाराचे नावही पुढे आले आहे.

भांडूप येथील 1903 सदनिकेचा कॉन्ट्रॅक्ट चोरडीया बिल्डरचा पुणे येथील न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. ला देण्यात आला. न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने यासाठी शरद पवारांचे बंधू प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीसोबत करार केला आहे. ही जागा प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीची आहे. त्याच्या सोबत या सदनिका बांधण्यासाठीचे डेव्हलपमेंट राईट, करार चोरडिया समूहाच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने केले आहे.

एका सदनिकेच्या मागे ४० लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवारांना १९०३ सदनिका महापालिका बाजारभावाने ५८ लाखात एक सदनिका घेणार आहे. ही सदनिका बांधण्यासाठी जमीन व बांधकामाचा खर्च म्हणून १५ ते १७ लाख खर्च होणार आहे. म्हणजेच एका सदनिकेच्या मागे रुपये ४० लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी व चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला मिळणार आहे, असे सोमय्या म्हणाले.

सिरम इन्स्टिट्यूटने 435 कोटी रुपयाचे शेअर 6% व्याज दराने गुंतवले
प्रताप पवार यांची निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे शेअर कॅपिटल फक्त रुपये 1 लाख आहे. परंतु या कंपनीत 2021 मध्ये 19 मार्च 2021 रोजी सिरम इन्स्टिट्यूटने 435 कोटी रुपयाचे शेअर 6% व्याज या दराने वीस वर्षासाठी या कंपनीत प्रेफरेन्स शेअर कॅपिटल म्हणून गुंतवले आहेत. या कंपनीने कोविड लस तयार केली होती. 1 लाखाचे शेअर कॅपिटल प्रताप पवार व त्यांच्या पत्नीचे 435 कोटीचे गुंतवणूक 6% दराने सिरम इन्स्टिट्यूट यांनी केली आहे.
़़़़़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *