मुंबई दि.10- गुजरातमधील जगप्रसिध्द सोमनाथ जवळील जुनागड जिल्हयातील गीर सासन अभयारण्यात आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी कुटुंबियांसोबत भेट दिली. भारतीय सिंहासाठी सुप्रसिध्द असणारे गीर सासन अभयारण्य हे देशातील मोठे प्रमुख आणि प्रचंड विस्तार असणारे अभयारण्य आहे. या अभयारण्यात आज ना. रामदास आठवले यांनी कुटुंबियासह लायन सफारी करुन वनराज सिंहाना पाहण्याचा आनंद घेतला.
रिपब्लिकन चळवळीचे पँथर ना.रामदास आठवले आणि गीर सासन अभयारण्यातील सिंहाची आज भेट झाली. महाराष्ट्रातुन आलेल्या रामदास आठवले या पँथरचे स्वागत गीर सासनच्या जंगलात येथील सिंहांनी त्यांच्या गाडीसमोर उभे राहुन केले. ना.रामदास आठवले या पँथरच्या नजरेला नजर देवुन गीर सासन अभयारण्यातील रस्त्यावर दोन सिंह उभे राहिले. एक सिंह पँथर रामदास आठवलेंच्या गाडीजवळ येवून बाजुने शांतपणे गेला. दुसरा सिंह गाडीसमोर रस्त्यावर लोळत होता.
सिंहाना बघुन मागे परतत असतांना रस्त्यात लोळत असलेला सिंह पुन्हा उठुन पँथर रामदास आठवले यांच्याकडे शांतपणे येत गाडीच्या बाजुने निघुन गेला. पँथर रामदास आठवले आणि गीर मधील सिंहाची भेट पाहण्याचा थरार अनुभव रामदास आठवले यांच्या पत्नी सौ.सिमाताई आठवले, पुत्र जित आठवले, आणि आठवले कुटूंबिय तसेच रिपाइंचे गुजरात राज्य अध्यक्ष अशोककुमार भट्टी, गुजरात रिपाइंचे प्रभारी जतीन भुट्टा यांनी अनुभवला.
गीर सासन अभयारण्य हे 1400 किलोमिटरचे नॅशनल पार्क आहे. येथील सिंहाचे मुख्य खाद्य हे हरिण आहेत. येथे हजारोंच्या संख्येने हरिण आहेत. येथे पाण्याचे ओढे आहेत. तसेच 36 बोरींग खोदण्यात आलेल्या आहेत. त्याद्वारे सिंहाना पाणी दिले जाते. येथील हरणांची शिकार सिंह एकत्र येवुन करतात. हरिण हे अत्यंत चपळ असल्याने दोन सिंह एकत्र येवून त्यांची शिकार करीत असतात. सिंहामधील हे सामजंस्य चकित करणारे असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.