पालघर/ प्रतिनिधी : पालघरचे वादग्रस्त तहसीलदार सुनील शिंदे यांनी लोकडाऊन काळात नागरिकांची तोडलेली घरे, गावी परतणाऱ्या मजुराला लाथा बुक्यांनी केलेली मारहाण या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी पार पडली. बेजबाबदारपणे वागणाऱ्या आणि आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या तहसीलदार शिंदे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा आहि मागणी कॉँग्रेस नेते, प्रदेश सरचिटणीस  संतोष केणे यांनी सुनावणीत केली. सुनावणीच्यावेळी बेघर नागरिक उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे

 लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने गावी परतण्यासाठी टोकनची प्रतीक्षा करणाऱ्या एका मजुराला पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच लोकडाऊनच्या काळात भर पावसात सुमारे 70 नागरिकांची घरे तोडून त्यांना बेघर केल्याचा प्रकार घडला होता. याचवेळी काँग्रेसचे कार्यालय तोडण्यात आले. या प्रकरणी केणे यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली होती. महसूलमंत्र्यांनी दखल घेऊन या प्रकरणा चा अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण आयुक्तांना दिले आहेत. कोकण आयुक्तांच्या आदेशानुसार  तहसीलदार शिंदे यांची अपर जिल्हाधिकारी पालघर यांच्या मार्फत रीतसर चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी अप्पर जिल्हाधिकारी घुटे यांच्याकडे पार पडली. सुनावणीत दोन्ही बाजूचे म्हणणे त्यांनी एकूण घेतले. तसेच जागेचे कागदपत्र, पुरावे, व्हिडिओ क्लिप सादर करण्यात आली. याचा अहवाल कोकण आयुक्तांना सादर  करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकार तहसिलदार शिंदे यांच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!