डोंबिवली : विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी
कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर् स्पर्धा दि .२९ व ३० जानेवारी २०२४ रोजी रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ८ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य आहे.

संतोष सोपान डावखर आणि त्यांच्या टीमकडून
२०१४ पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी अंदाजे २५ हजाराहुन अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात. शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञाना बद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होत असते. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख, पारितोषिक, विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या वर्षी ५० हुन अधिक शाळांनी सहभाग घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *