मुंबईत रविवारपासून कलाकारांसाठी खुले व्यासपीठ

कलाकारांनो सहभाग नोंदवा: बीएमसी व एमटीडीसीचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक, कला, नाटय, चित्रपट, संगीत, फॅशन त्याचबरेाबर महाराष्ट्रीयन तसेच भारतीय लोकनृत्यांचे विविध प्रकार याचा आनंद मुंबईकरांना व देश विदेशातील पर्यटकांना लुटता यावा. तसेच मुंबईची ओळख जगभर व्हावी या हेतूने मुंबई महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ नोव्हेंबरपासून ते मे २०१८ पर्यत दर रविवारी कलाकारांसाठी जहांगीर आर्ट गॅलरीसमोरील चौकात भव्य खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुंबई महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले आहे.

मुंबईकरांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा या हेतूने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना साकरण्यात आलीय. खुल्या व्यासपीठामुळे मुंबई शहराच्या पर्यटनाला विशेषत: भारतीय पर्यटनाला पोषक वातावरण तयार करण्यासाठीच महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे आयुक्तांनी सांगितलं. या व्यासपीठावर कला सादर करण्यासाठी आतापर्यंत २१ कलाकारांनी नोंदणी केली असून प्रत्यक्षात ११ जणांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये बॉलीवूडचे संतोष मिजगर यांनी आठ जागांची नोंदणी केली असून, ते बॉलिवूडमधील थीम साकारणार आहेत. सुप्रसिध्द व्यंग्यचित्रकार विकास सबनीस हे व्यंगचित्र साकारणार आहेत. रूपाली मदन या स्केच आर्टिस्ट वर कला सादर करणार आहेत. मुंबई शहराचा सांस्कृतीक वारसा वृध्दींगत करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणारी विविध क्षेत्रातील नामवंत प्रतिभावंत कलावंतही यावेळी उपस्थित राहणार आहेत. हे व्यासपीठ मे २०१८ अखेपर्यंत दर रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कलाकारांसाठी उपलब्ध राहणार आहे. मुंबई शहराची ओळख जगभर पोहचविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली जाणार आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांनी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन मुंबई महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केले आहे.

कुठे नोंदणी कराल
महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे (भ्र. ८४२२८२२००३ )व मुंबई महापालिका ए विभागाचे सहाययक आयुक्त किरण दिघावकर(भ्र. ९९२०१८५२०१) अथवा कार्यालय क्र ०२२२२६६७०३८, ए विभाग तक्रार निवारण अधिकारी अमोल पाटील (भ्र.९१६७४८०५३६), ए विभागाचे कनिष्ठ अभियंता निलेश तोरसकर (भ्र. ९८१९३२३८५०) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करता येणार आहे. तसेच http:/m.facebook.com/mcskalaghoda/ या फेसबुक पेजवर संपर्क साधता येणार आहे.
—-

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *