उघडयावर शौचास महागात पडले, एका कुटूंबाला ७५ हजाराचा दंड
रामबखेडी : स्वच्छ भारत मोहिम देशभरात राबवली जात असून स्थानिक प्रशासनाकडून स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत. मात्र तरीसुध्दा आजही अनेक ठिकाणी उघडयावर शौचाला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र मध्य प्रदेशात रामबखेडी येथील कुटूंबाला उघडयावर शौचास बसणे चांगलेच महागात पडले आहे, स्थानिक प्रशासनाने त्या गावातील कुटूंबाला तब्बल ७५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे तर गावातील इतर ४३ कुटूंबियांना नोटीस बजावली आहे.
रामबखेडी ग्रामपंचायतीने या कुटूंबाला उघडयावर बसू नये अशी तंबी दिली होती मात्र याकडे त्या कुटूंबाने दुर्लक्ष केल्याने त्यांना ७५ हजाराचा दंड ठेाठावला आहे. अनेकदा सांगूनही या कुटुंबातील सदस्यांनी घरात शौचालय बांधले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे, असे या गावच्या सरपंच रामरतीबाई यांनी स्पष्ट केलंय.