डोंबिवली : सुशिक्षित आणि सुसंस्कृत नगरी म्हणून ओळख असणाऱ्या डोंबिवलीत शहरात सध्या ऑनलाईन लॉटरीचा सुळसुळाट सुरू आहे. काही लॉटरी माफियांनी स्वतःचा ॲप तयार करून लोटो ऑनलाइनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे ऑनलाईन लॉटरी चालवली जात आहे. त्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवायला जात असून, अनेक कुटुंब देशोधडीला लागली आहे . याकडे स्थाईक पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
डोंबिवली पश्चिमेत आणि पूर्वेत अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरात ऑनलाईन लॉटरीची दुकान थाटण्यात आली आहेत. राज्य शासनाचा कोणताही कर न भरता बेकायदेशीरपणे ऑनलाईन लॉटरी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. लॉटरी मफियानी स्वतः चा ॲप तयार करून ऑनलाईन व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्व ऑनलाईन सेंटरची पोलीस यंत्रणेकडून तसेच शासनाच्या संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
ऑनलाईन लॉटरीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुरफटत चालली आहे. लॉटरीच्या जुगाराच्या व्यसनामुळे वाम मार्गाने पैसा कमवण्याकडे कल वाढू लागला आहे. असे जागरूक नागरिकाने सांगितले. याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलून बेकायदेशीर ऑनलाइन सेंटरवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
**