ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सज्ज

आंबेडकरी अनुयायांची ७० शाळांमध्ये निवासाची व्यवस्था

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ०६ डिसेंबर २०१७ रोजी असलेल्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दाखल झालेल्या आंबेडकर अनुयायांची ओखी चक्रीवादळ आणि पाऊस यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या ७० शाळांमध्ये तात्पुरती निवासाची सर्व सोयी सुविधांसह व्यवस्था करण्यात आलीय. ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने समुद्रकिना-यापासून जवळ असणा-या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात असून महापालिका सज्ज झालीय.

दादर रेल्वे स्टेशनवर उतरणाऱया अनुयायींना शिवाजी पार्क मंडपात न घेऊन जाता त्यांना विनाशुल्क बेस्ट बसेसव्दारे आसपासच्या परिसरात उपलब्ध असणाऱया शाळांमध्ये नेण्यात येत आहे. ज्या शाळांमध्ये अनुयायींकरिता तात्पुरत्या निवाऱयाची सोय करण्यात आली आहे, त्याठिकाणी वैद्यकीय तपासणीदेखील सुरु करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या अधिका-यांची पथके तयार करुन गस्त घालण्याचे आदेश देण्यात आलेत. अग्निशमन दल, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नौदल यांची पथके चैत्यभूमी परिसरात तैनात ठेवण्यात आली आहेत, तर भारतीय तटरक्षक दलास सतर्क ठेवण्यात आले आहे. तसेच दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमीकडे जाण्याकरिता बीईएसटीमार्फत मोफत बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचे पैसे महापालिकेमार्फत बीईएसटीला अदा करण्यात येणार आहेत. चैत्यभूमी परिसरात येणा-या अनुयायांकरिता जेवणाची व पाण्याची व्यवस्था तात्पुरत्या निवा-यांच्या ठिकाणी संबंधित सहाय्यक आयुक्त व अशासकिय संस्थांमार्फत करण्यात आलेली आहे. चैत्यभूमी परिसरात 9 तात्पुरते आरोग्य कक्ष उभारण्यात असून अधिक मदतीकरिता महापालिकेच्या व 108 आणीबाणी वैद्यकिय सेवेच्या रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही रस्ते, पूल, सि लिंक बंद ठेवण्यात आलेले नाहीत. मुंबई शहर व उपनगरातील रेल्वे सेवा, वाहतूक सेवा सुरळीत सुरु आहे. नागरिकांनी / पर्यटकांनी कृपया समुद्रकिनारी आत जाणे टाळावे तसेच अफवा पसरवू नयेत व अफवांवर विश्वास ठेवू नये असा सर्तकतेचा इशारा पालिकेने दिलाय.

 

 

दादर स्थानकात केली जेवणाची व्यवस्थाभा

रतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत लाखो आंबेडकर अनुयायी दादर चैत्यभूमबीवर धडकलाय. ओखी चक्री वादळाचे सावट आणि पाऊस याची तमा न बाळगता लाखो अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई महापालिकेने 70 शाळांमध्ये यांच्या निवासाची व्यवस्था केलीय. तर अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दादर रेल्वे स्थानकात आंबेडकर अनुयायांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!