आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयात नायलॉनच्या जाळया

मंत्रालय कि सर्कसचा फड ? : विरोधकांकडून सरकारवर टीका 

मुंबई : मंत्रालयात सातत्याने होत असलेल्या आत्महत्या आणि आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या लॉबीमध्ये नायलॉनच्या जाळया बसविण्यात आल्या आहेत. मात्र या जाळया बसवण्याच्या प्रकारावर विरोधकांनी सरकारवर चांगलीच टीका केलीय. मंत्रालय कि सर्कसचा फड ? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. जाळी लावण्यापेक्षा सरकारने कारभारावरील  जाळी – जळमटे काढावीत अ्रशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाष्ण  विखे पाटील यांनी केलीय.

गेल्या आठवडयात मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन हर्षल सुरेश रावते या तरूणाने उडी घेतली होती. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लिगल स्वयंसेवक असलेल्या 43 वर्षीय हर्षलचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. तर ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले हेाते त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यु ओढावला होता. मंत्रालयातील वाढत्या आत्महत्येच्या घटनांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मंत्रालय कि आत्म्हत्यालय अशी टीका केली हेाती. आत्महत्या अथवा आत्महत्येच्या प्रयत्नांच्या घटना वारंवार घडत असल्यानेच प्रशासनाने जाळया बसविण्याचा निर्णय घेतलाय. सोमवारपासून जाळया बसविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आलीय.

सरकारने कारभारावरील जळमटे काढावीत : विखे पाटील

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जाळी लावण्याच्या प्रकारावर सरकारवर टीका केलीय. लोकांनी उडया घेऊ नये म्हणून मंत्रालयाच्या दुस- या मजल्यावर संरक्षक जाळी लावण्यात आलीय. पण फक्त जाळी लावून उपयोग नाही जनतेला न्याय द्यायचा असेल तर सरकारने आधी आपल्या कारभारावर लागलेली जाळी जळमटी काढली पाहिजेत. ती जाळी काढणार नसाल तर या जाळीचा काडीचाही उपयोग नाही अशी टीका  विखे पाटील यांनी ट्विरवर केलीय.

 

 

मंत्रालय कि सर्कसचा फड ? मुंडे 

मंत्रालय कि सर्कसचा फड ?  असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. हे सरकारचे विकासाचे मॉडेल आहे का,’ असा प्रश्नही मुंडे यांनी उपस्थित करून अरे कुठे नेऊन ठेवले प्रशासन ?  अस ट्विट केलय.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *