सेवेत कायम करण्यासाठी नर्सेसचे आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन
घाटकोपर (निलेश मोरे) :सेवेत कायम करण्यासाठी शेकडो नर्सेसने राज्य कास्टईब कर्मचारी कल्याणमहासंघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन केले. सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने बंधपत्रीत नर्सेसच्या सेवा नियमित करण्यासाठी 15 एप्रिल 2015 ला अधिसूचना पारित केली असताना आयुक्तालयाकडून एप्रिल 2015 ची अधिसूचना मान्य न करता नव्याने सेवा भरती सुरू केली दरम्यान 5 ते 6 वर्षांपासून सेवा देत असलेल्या 150 – 160 मुलींपैकी एकाही नर्सेसचे निवड यादीत नाव न आल्याने आज महाराष्ट्र राज्य कास्टईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने दिनांक 26 डिसेंबर 2017 पासून मुंबई आझाद मैदानात बेमुदतधरणे आंदोलन करण्यात आले आहे . महासंघाचे राज्यसचिव एस टी गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की नव्याने केलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेची चौकशी व्हावी , सर्व बंधपत्रितांना सेवेत कायम करताना एकच अधिनियम करण्यात यावा , 15 एप्रिल 2015 ची अधिसूचना सर्व आरोग्य बंधपत्रीत नर्सेसला लागू करा अशी मागणी या धरणे आंदोलनात केली आहे . जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत हे बेमुदत धरने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं महासंघाच्या महिला आघाडी रजनी लोखंडे यांनी सांगितले .