ठाणे : चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाजाचा एक दिवस एकविरा गडावर हा उपक्रम येत्या २७ नोव्हेंबर २०२१ रोजी कार्ला येथील एकविरा गडावर होणार आहे. या उत्सवासाठी देशाच्या सर्व भागातून गेली सहा वर्षे सीकेपी समाजातील मंडळी एकविरा गडावर येत असतात.

सीकेपी संस्थेतर्फे सुरु करण्यात आलेल्या या एकविरा देवीच्या उत्सवाला सीकेपी समाजाकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. उत्सवाच्या निमित्ताने एकविरा गडावरील संपूर्ण वातावरणच बदलून जात असून या उत्सवाने एकविरा गड परिसरातील वातावरणच बदलून गेले असल्याचा दावा परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने प्रत्यक्ष गडावर कोणताही कार्यक्रम करण्यास परवानगी नसल्याने एकविरा गडावर सकाळची महापूजा, दर्शन, पालखी इत्यांदी मोजकाच कार्यक्रम आखण्यात आला आहे. इतर कार्यक्रम सकाळच्या महापूजेपासून गोंधळ, भारुड, महाआरती इत्यांदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. उत्सवाला देशाच्या सर्व भागातील सीकेपी बांधव आवर्जुन हजेरी लावतात. उत्सवासाठी दादर, विलेपार्ले, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पुणे, महाड आदी ठिकाणांहून खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. देशातील महत्वाच्या उत्सवांमध्ये नोंद घेण्याजोगा हा उत्सव तथा उपक्रम असल्याचे अनेक ज्ञातीबांधवांनी सांगितले आहे.

२७ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार्‍या उत्सवासाठी ज्ञातीबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सीकेपी संस्थेतर्फे तुषार राजे, चंद्रशेखर देशपांडे, पुरुषोत्तम फडणीस व राधिका गुप्ते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!