शिवनलिनीने वृद्धाश्रमात साजरा केला, मातृ- पितृ पूजन दिवस !
डोंबिवली :- सर्वत्र व्हँलेंटाईन डे साजरा होत असताना शिवनलिनी प्रतिष्ठान ने आगळावेगळा उपक्रम साजरा केला. “आई वडीलच आपले सर्वस्व आहेत, त्यांना परकं करू नका” असा संदेश यावेळी देण्यात आला. प्रतिष्ठानतर्फे सागर्ली येथिल मैत्री व्रुद्धसेवा संस्थेतील व्रुद्धांना खाऊ वाटप करत हा उपक्रम राबविण्यात आला.
*आजच्या पिढीची प्रेमभंग, एकतर्फी प्रेमातून स्वत:चे आयुष्य संपविण्यापर्यंत मानसिकता झालेली आहे. मात्र यामुळे तुमच्या जन्मदात्यांवर आयुष्यभरासाठी दु:खाचा डोंगर कोसळतो व समाजात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते यामुळे असले टोकाचे पाऊल उचलण्यापुर्वी जन्मदात्यांचा विचार तरूणांनी पहिले करावा” असा संदेश प्रतिष्ठानचे महाव्यवस्थापक अनिरूद्ध कुलकर्णी यांनी दिला.
तुम्हाला जन्मदात्यांनी स्रुष्टी दाखवली, चालायला – बोलायला शिकविले यापेक्षा मोठे गिफ्ट नाही त्यामुळे आईवडिलांचे प्रेम विसरू नका आणि त्यांना व्रुद्धाश्रमाची वाट दाखवू नका, असेही यावेळी ते म्हणाले.या वेळी प्रतिष्ठानचे शहर अध्यक्ष दत्ता वाठोरे, उमेश अत्तेकर, समाधान पवार, राकेश पाटील, अक्षदा भोसले, विनोद मोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मैत्री संस्थेच्या पदाधिकार्यांनी या संकल्पनेचे कौतुक केले