ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेच्या पंपिंग मशिनरी बसविण्यासाठी तसेच इतर अत्यावश्यक कामे करण्यासाठी बुधवार दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे
बुधवार दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटर्निटी, कोलशेत तसेच आझादनगर या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्र्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.