नवी दिल्ली – बांगलादेशातून भारतात आलेल्या आणि बंगाली भाषा बोलणाऱ्या मुस्लीमांनी त्यांच्या धर्मातील अनिष्ट प्रथांचा त्याग करावा, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केले. बंगाली भाषा बोलणाऱ्या बांगला देशी मुस्लीम स्थालांतरितांनी दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घालू नयेत, बहुपत्नीत्वाचा त्याग करावा. तसे केल्यास भविष्यात त्यांनाही इथले मूळ रहिवासी मानले जाऊ शकेल, असे शर्मा म्हणाले.
येथील वैष्णवांच्या मठाच्या जमीनींवर अनधिकृतपणे अतिक्रमण वास्तव्य करीत असलेल्या बंगाली भाषिक मुस्लीमांना मूळ रहिवासी कसे मानता येईल,असा सवाल करीत सर्मा म्हणाले की, त्यांना जर मूळ रहिवासी असा दर्जा हवा असेल तर त्यांनी बाल विवाह, बहुपत्नीत्व असल्या अनिष्ट प्रथा सोडून द्याव्यात. तसेच दोन पेक्षा अधिक मुले जन्माला घालणे बंद करावे, असे सर्मा म्हणाले.
तुम्ही तुमच्या मुलांना मदरशांमध्ये पाठवता. त्याऐवजी शाळेत पाठवा. उच्च शिक्षण देऊन त्यांना डॉक्टर , इंजिनीअर बनवा. तुम्हाला आसामचे मूळ नागरिक म्हणवून घ्यायचे असेल तर तुमच्यात या सुधारणा करा, असा सल्लाही सर्मा यांनी दिला.