नारायण राणेंच्या पक्षात नितेश राणे वेटींगवर 

मुंबई : नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली असली तरी राणेंच्या पूत्र आमदार नितेश राणे हे वेटींगवरच आहेत. वेटींगवर असल्याचे नितेश यांनी स्वत:च ट्विट केले आहे. नितेश राणे या नवीन पक्षाचा भाग असतील की नाही याबाबत मात्र नारायण  राणे यांना पत्रकारांना विचारले असता  मी ज्योतिषांना विचारून सांगतो, असं म्हणत नितेश राणे यांच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी उत्तर देणं टाळलं होत . पण काही तासानंतर नितेश राणे यांनी वेटींगवर असल्याचे ट्विट केले आहे.  माझ्या मुलाने माझ्याआधी त्याच्या आजोबांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. मी अजूनही प्रतीक्षेतच आहे. जय स्वाभिमान!!”, असे नितेश राणे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

One thought on “नारायण राणेंच्या पक्षात नितेश राणे वेटींगवर ”
  1. Qsearch, free ads, free classifieds, free advertisement, online
    classifieds, Qatar classifieds, free classifieds in Qatar,
    jobs in qatar, qatar social, qatar restaurants, restaurant
    in Qatar, qatar schools, events in qatar, qatar news,
    qatar business directory https://qsearch.qa/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *