राहुल गांधीं अध्यक्ष झाल्यास, 5 डिसेंबरला निराधार व देवदासी महिला संघटना मुंडन करणार
संघटनेचे अध्यक्ष विलास रुपवतें यांना पोलिसांकडून नोटीस
घाटकोपर ( निलेश मोरे ) : भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहूल गांधी यांची निवड होणार असल्याने त्या विरोधात महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेने मुंडन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. संघटनेचे अध्यक्ष विलास रुपवतें आणि आशाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली 5 डिसेंबर रोजी घाटकोपर मेट्रो स्थानक येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रुपवतें यांनी दिली.
राहुल गांधी भारतीय काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी असताना ते महाराष्ट्रातील निराधार , विधवा आणि देवदासी महिलांना न्याय देऊ शकले नाही. काँग्रेसकडून नेहमी तुच्छ भूमिका घेतली गेली. असे रुपवतें यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी यांची 5 डिसेंबर 2017 रोजी अध्यक्ष पदी निवड होत असल्याची माहिती समोर येत आहे . 6 डिसेंबरला घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे . या दिवशी संपूर्ण देशात दुःखाचा दिवस असताना महापरिनिर्वाणाच्या एक दिवस अगोदर राहूल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करून काँग्रेकडून 6 डिसेंबरला फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा होणार आहे असेही रूपवती यांनी सांगितले. काँग्रेस हा जातपात निर्माण करणारा पक्ष असल्याची आरोप रुपवतें यांनी केला.
या आंदोलन प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल फडके यांनी रुपवते यांना भा.द.वि कलम 149 ची नोटीस बजावली आहे. हे मुंडन आंदोलन आझाद मैदान येथे घेण्यात यावे अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असे नोटीसीत म्हटले आहे.मात्र पोलिसांकडून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप रुपवतें यांनी केलाय.
———