मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला पून्हा एकदा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते.

निलम गेा-हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होत्या अखेर यावर शिक्कामोर्तब झाल. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांच्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपावली. मनिषा कायंदे यांच्यानंतर आता निलम गोऱ्हे यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

नीलन गोऱ्हे यांनी जवळपास २५ वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांनी वेळोवेळी शिवसेनेची बाजू मांडली आहे. त्यांनी महिलांसाठी मोठं कामही केलं आहे. निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे पाहिलं जातं. इतकी वर्ष ठाकरेंसोबत असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गावर जात आहे. महिला विकास, महाराष्ट्र आणि देश विकासाच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

गो-हेंच्या प्रवेशावर बोलताना शिवसेना आमदार अनिल परब यांनी टीका केली. शिवसैनिकांच्या मेहनतीवर चार टर्म आमदारकी उपभोगली. ज्या शिवसैनिकांच्या जोरावर आतापर्यंत त्यांनी पद भोगली.त्या शिवसैनिकांना किती यातना होत असतील. सगळी पद उपभोगल्यांनतर पक्षाला दगा देणं हे उच्चपदस्थ पदाधिका-यांना शोभत नाही असे परब म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!