सिटीझन जर्नलिस्ट 4 या न्यूज पोर्टलचे, रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : सोशल मिडीया क्षेत्रात नव्याने पर्दापण करणारे citizenjournalist4 या मराठी न्यूज पोर्टलचे उद्घघाटन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रविवार सकाळी त्यांच्या संविधान बंगल्यात पार पडले. यावेळी  रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबालकर, कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, रिपाइंचे युवक जिल्हाध्यक्ष जय जाधव, रामा कांबळे, बर्वे, सुरेश गायकवाड, सिटीझन जर्नलिस्टचे संपादक संतोष गायकवाड, पत्रकार आकाश गायकवाड, छायाचित्रकार सुरेश ढेरे आदी उपस्थित होते. मुंबई ठाणेसह महाराष्ट्रातील विविध बातम्यांसह सामाजिक, राजकीय, गुन्हे, क्रीडा, मनोरंजन, अर्थजगत अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य राहणार आहे.

One thought on “सिटीझन जर्नलिस्ट 4 या न्यूज पोर्टलचे, रामदास आठवले यांच्या हस्ते उद्घाटन”
  1. भारततिल प्रत्येक गावात बुध्दविहार बांधा व पाच जिल्हे मिळून एक विपश्यना केंद्र तरी निर्माण करा
    आठवले साहेबांना विनंती की,खाजगी क्षेत्रातिल किमान वेतन कायदा बदल करून वेतन वाढवण्याचे निर्देश खाजगी कंपन्यांना द्या ही आग्रहाची विनंती
    जयभिम जयबुध्द जय भारत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *