राष्ट्रवादी महिला काँग्रेसने जाळली ईव्हीएम आणि मनुस्मृती
निवडणूक आयोग झालेय सत्ताधार्यांच्या हातचे बाहुले
माजी मंत्री फौजीया खान यांचा आरोप
ठाणे ( उमेश वांद्रे ) ईव्हीएममध्ये घोटाळा करूनच भाजप सत्तेमध्ये येत आहे. प्रत्येक राज्यामध्ये ईव्हीएमचा घोटाळा सुरू आहे. राष्ट्रवादीसह 17 पक्षांनी ईव्हीएम हटाओची मागणी केली आहे. पण निवडणूक आयोग ती मागणी मान्य करायला तयार नाही. सध्या निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातचे बाहुले झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी केला. दरम्यान यावेळी फौजीया खान यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ईव्हीएम आणि माणूसरुतीचे दहन केले.
राष्ट्रवादी राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या वतीने बुधवार दिनांक 5 डिसेंबर, 2018 रोजी रोहा, रायगड येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष श्री. जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस श्री. सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित “संविधान बचाव देश बचाव” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रविवारी कळवा येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी फौजीया खान यांनी पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला. यावेळी आमदार श्रीमती. विद्याताई चव्हाण, ऋता आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, सरचिटणीस प्रभाकर सावंत आदि उपस्थीत होते.
फौजीया खान म्हणाल्या की, या देशामध्ये आराजकता माजली आहे. कितीही मोर्चा-आंदोलने केली. तरी हे सरकार कोणाचेही ऐकत नाही. मराठा समाजापुढे हे सरकार झुकले असले तरी सबका साथ , सबका विकास असे म्हणणारे मोदी-फडणवीस हे धनगर आणि मुस्लीम समाजावर अन्याय करीत आहेत. संविधानाने समताधिष्ठीत व्यवस्था लागू केली आहे. तरीही आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार दोन समाजांवर अन्याय करीत आहे. या सरकारला हिंदुत्वाच्या नावाखाली मनुवादी व्यवस्था आणायची आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दंगे घडवायचे आहेत. हुकूमशाही लादून संविधान संपायचे आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही. ज्या मनुस्मृतीने येथे वर्णव्यवस्था लादली होती. ती मनुस्मृती दूर करून बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचे राज्य आणले होते.मात्र आताच्या सरकारला हे राज्य नको आहे. त्यांना हुकूमशाही आणायची आहे. झुंडशाहीच्या रूपाने हे लोक रक्त सांडत आहेत. मंदिर- मशीद आणि क्षारांची नवे बदलवून मूळ विकासाचे मुद्दे बाजूला सारत आहेत. त्यामुळे आता हे सरकार बदलण्याची जबाब्दारी आपली आहे. आता आपण नोकरी, आरोग्य , शिक्षण याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत . त्यासाठी महिलांनी आक्रमक होण्याची गरज आहे. महिला या कळीच्या रूपात आहेत. त्यांनी आता या मोदी सरकारला जाळले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
आ. विद्याताई चव्हाण यांनीं, देवेंद्र -नरेंद्र यांच्यामुळे या देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. जंतर मंतरवर संविधान जाळण्यापर्यंत लोकनाची मजल जाते . आणि हे सरकार त्यांना अभय देत आहे. संविध्यानामुळे या देशातील महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे. पण हे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. सनातन, आर एस एस , भाजप हे दहा तोंडी राव आहे. त्याला आता आम्ही जळणार आहोत. कारण या लोकांनां देशात डांगे घडवायचे आहेत. त्यासाठीच हे लोक अधिवेशन सोडून अयोध्येत मंदिर बांधायला जात आहेत. पण, आम्ही त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगितले. तत्पूर्वी भाषणामध्ये ऋता आव्हाड यांनी सांगितले कि, या देशात पुन्हा महिलांना दाबण्याचे मूळ प्रवाहातून बाजूला सरण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी हे लोक मनूचे राज्य आणत आहेत. पण हे मनूचे म्हणजेच मोदींचे राज्य उलथवून टाकले पाहिजे. तर, आनंद परांजपे यांनी महिलांना संबोधित करताना ”ढोल, पशु , शूद्र और नारी ; सब है ताडन के अधिकारी अशी मानसिकता या सरकारची आहे. हि मानसिकता संविधानाने बदलली आहे. त्यामुळेच हे सत्तदाहारी संविधानाचे राज्य बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण त्यांनाच बदलून टाकू , असे सांगितले हा मेळावा संपल्यानंतर उपस्थित महिलांनी मनुस्म्रुती आणि ईव्हीएमचे दहन केले. तसेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली